एक्स्प्लोर
स्वामीनाथन यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करा : शिवसेना

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी भेटणार होणार आहे. पण त्याआधी शिवसेनेकडून राष्ट्रपतीपदासाठी डॉ. एम एस स्वामीनाथन यांचं नाव सुचवण्यात आलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर भाजपला शिक्कामोर्तब करायचं नसेल तर डॉ. एम एस स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की,
"राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून
शिवसेनेची मोहन भागवत यांना पहिली पसंती आहे.
परंतु भाजपला मोहन भागवत यांच्या नावाला विरोध असेल तर
हरीतक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करावं, अशी आमची मागणी आहे."
कोण आहेत स्वामीनाथन?
1925 - 7 ऑगस्ट, जन्म 1944 - त्रावणकोर विद्यापीठातून बी.एस्सी 1947 - कोईम्बतूर शेतकी महाविद्यालयातून कृषी पदवी 1948 - दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन संस्थेत जनुकशास्त्र व वनस्पती पैदाशीवर असोसिएटशिप 1949 - नेदरलँड्सच्या वॅजेनिन्जेन शेती विद्यापीठात युनेस्कोकडून जनुकशास्त्रासाठी फेलोशिप 1952 - इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून बटाट्यावरील संशोधनासाठी पीएचडी 1952 - अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात जनुकशास्त्रातील सहायक संशोधक 1954 - कटकच्या भात संशोधन केंद्रात जनुकशास्त्र संशोधन व शेती संशोधनासाठी मार्गदर्शक 1954 ते 72 - दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेत संशोधन, शेती संशोधनासाठी मार्गदर्शन व व्यवस्थापन 1972 ते 79 - भारतीय शेती संशोधन संस्थेचे महासंचालक, केंद्रीय शेती व शिक्षण विभागाचे सचिव 1979 ते 80 - केंद्रीय शेती व सिंचन विभागाचे सचिव 1980 - नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष 1980 ते 82 - नियोजन आयोगात शेती, ग्रामीण विकास, विज्ञान व शिक्षण विभागाचे सदस्य 1982 ते 88 - फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राचे महासंचालक 1989 - पासून चेन्नईमधील एम. एस. स्वामीनाथन संशोधन संस्थेचे अध्यक्ष 2004 - राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्षआणखी वाचा























