एक्स्प्लोर
मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये 13 जणांचा मृत्यू
कालच्या पावसामुळं मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई/ ठाणे/ पालघर : काल दिवसभर मुंबई आणि उपनगरांना झोडपणाऱ्या पावसाचा क्रूर चेहरा आज उघड झाला आहे. कारण कालच्या पावसामुळं मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विक्रोळीमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तर ठाण्यामध्ये कालपासून 4 जण वाहून गेलेत. याशिवाय कालच्या पावसात नेमके किती बेपत्ता झाले आहेत, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
दुसरीकडे पालघरमध्ये देखील पावसानं कहर केला असून, आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू आणि बोईसर परिसरात मुसळधार पावसात 4 जण वाहून गेले. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे.
तर आज सकाळी विनोद दळवी नावाचा तरूण जव्हार परिसरातल्या नाल्यातून वाहून गेला. नरू वळवी नावाचा मुलगा बोटीनं सातपाटी येथे जात असताना बुडाला आहे.
संबंधित बातम्या
LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स
मुंबईचा पाऊस : कालच्या पावसात अनेकजण बेपत्ता
26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?
मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू
मुंबईत पुन्हा पाऊस सुरु, गरज असेल तरच बाहेर पडा!
मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement