एक्स्प्लोर
Advertisement
वाशीतील एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला, बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी
वाशीतील एमजीएम रुग्णालयाची संपूर्ण माहिती अज्ञात हॅकरने हॅक केली आहे.
नवी मुंबई: वाशीतील एमजीएम रुग्णालयाची संपूर्ण माहिती अज्ञात हॅकरने हॅक केली आहे. यंत्रणा पूर्ववत करायची असेल तर हॅकर्सनी बिटकॉइनद्वारे खंडणी द्या, अशी अट घातली आहे. या सायबर हल्ल्यात रुग्णालयाची मागील 15 दिवसांची माहिती चोरीला गेली आहे.
याबाबत तक्रार देण्यात आली असून अज्ञात हॅकर्सविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात खारघर येथील थ्री स्टार हॉटेलची संपूर्ण यंत्रणा अशाच पद्धतीने हॅक करण्यात आली होती. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाकडे 400 यूएस डॉलर आणि बिटकॉइनची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, रविवारी रात्री नऊच्या सुमारास हॅकरने एमजीएमच्या न्यू बॉम्बे रुग्णालयातील डेटाचोरी केली. वाशी सेक्टर 3 मध्ये एमजीएमचं हे न्यू बॉम्बे रुग्णालय आहे.
हॅकरच्या डेटाचोरीमुळे रुग्णालयातील सर्व कॉम्प्युटर बाधित झाले. मात्र व्यवस्थापनाने ही यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले, पण ती होऊ शकली नाही. त्यानंतर रुगणालयातील 15 दिवसांचा डेटा चोरीला गेल्याचं आढळलं.
डेटाचोरीनंतर रुग्णालयातील कॉम्प्युटरवर एक लिंक आली. त्याद्वारे बिटकॉईन स्वरुपात खंडणी मागितली होती. रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
काय आहे बिटकॉईन?
बिटकॉईन हे एक नवं डिजीटल चलन आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंगवर आधारित व्यवहारांसाठी याची निर्मिती झाली.
2009 मध्ये याचा शोध सातोशी नाकामोतो नावाच्या एका जपानी इंजिनियरने लावला.
बिटकॉईनसाठी खरेदी केल्यानंतर कॉप्युटर किंवा मोबाईलवर त्याचे इ वॉलेट तयार होतं.
या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एकपेक्षा जास्त वॉलेट तयार करु शकतात.
याचा वापर ईमेलप्रमाणे केला जातो. पण यात फरक केवळ इतकाच आहे की, याचा पत्ता केवळ एकदाच वापरता येतो.
याचा वापर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. तसेच याचं नियंत्रण कोणत्याही एका अधिकृत संस्थेकडे किंवा सरकारकडे नाही.
सध्या बिटकॉइनचं मूल्य भारतीय चलनानुसार तब्बल 70 हजारापेक्षा जास्त आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement