एक्स्प्लोर

Coronavirus : क्वारंटाईनचा शिक्का असूनही चौघा संशयितांचा रेल्वेतून प्रवास

गरीब रथ एक्स्प्रेसमधील या चौघा संशयितांची माहिती मिळताच गरीबरथ एक्स्प्रेस डहाणू रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. मुंबईकडून दिल्लीकडे जाणाऱ्या या गाडीला पालघर येथे थांबा देऊन चार संशयित करोना रुग्णांना पालघरच्या रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आलं.

पालघर : परदेशातून आलेल्या गुजरात राज्यातील चार प्रवाशांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का असल्याने रेवले मधील सहप्रवासी व तिकीट तपासणीस यांनी त्यांना पालघर रेल्वे स्थानकात गाडी थांबून उतरण्यास भाग पाडले. या चारही प्रवाशांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नसल्याने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या आग्रहापोटी खाजगी वाहनातून त्यांच्या मूळ गावी जाण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली. 12216 डाऊन गरिबरथ या गाडीमध्ये जी-4 आणि जी-5 या दोन डब्यांमध्ये चार प्रवाशांच्या हातावर अलगीकरण करण्याचे शिक्के असल्याचे सहप्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी ही बाब तिकीट तपासनीसच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रवाशांच्या सहवासामुळे आपले आरोग्य धोक्यात येईल हे लक्षात घेता तिकीट तपासनीस यांच्याकडे आक्षेप नोंदवला. नंतर तिकीट तपासणीसांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात थांबविण्याच्या सूचना दिल्या. पालघर रेल्वे स्थानकात दिल्लीकडे जाणारी गाडी थांबत असून त्याच्यामध्ये करोनाबाधित रुग्ण असल्याची उद्घोषणा फलाटावर करण्यात आल्याने उपस्थित प्रवासी व इतर नागरिकांची एकच धावपळ सुरु झाली. लगेचच फलाट रिकामी करण्यात आला. दोन वाजण्याच्या सुमारास ही गाडी पालघर रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर या चार प्रवाशांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले. पालघरच्या आरोग्य पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त तपासल्यानंतर या चारही प्रवाशांना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळत नसल्याचे दिसून आले. प्रथम या रुग्णांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्याची तयारी करण्यात आली होती. नंतर त्यांना बोईसर येथील टिमा रुग्णालयात निर्माण केलेल्या स्वतंत्र अलगीकरण कक्षात ठेवण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रवासी पालघर येथे वास्तव्य करण्यास तयार नसल्याने जर्मनीहून आलेल्या या प्रवाशांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा आग्रह धरल्याने राज्य करोना कक्षाशी संपर्क साधून, त्यांच्याकडून मार्गदर्शन सूचना प्राप्त केल्यानंतर खाजगी वाहनातून त्यांना सूरतच्या दिशेने पाठवण्यात आल्याची माहिती पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली. या चार प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनाने गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाला कळवली असून या चारही रुग्णांचा पाठपुरावा पालघर करोना दक्षता कक्षातून देखील करण्यात येईल असे सांगण्यात आले दरम्यान कोरोना व्हायरसने जगभर अक्षरश: थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास 8 हजार लोकांचा या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 147 वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या ज्या वुहान शहरातून या कोरोनाची व्हायरसरची सुरुवात झाली होती, तेथील परिस्थिती आता जवळपास नियंत्रणात आली आहे. तर राज्यात रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. coronavirus | गर्दी टाळा... पण लोक ऐकत का नाहीत? राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
  • पुणे - 8
  • पिंपरी-चिंचवड - 10
  • मुंबई - 7
  • नागपूर - 4
  • यवतमाळ - 3
  • कल्याण - 3
  • नवी मुंबई - 3
  • रायगड - 1
  • ठाणे - 1
  • अहमदनगर - 1
  • औरंगाबाद - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget