एक्स्प्लोर
लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार
26 लोकसभा मतदारसंघांपैकी काही जागा वादग्रस्त असून तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. औरंगाबाद, पुणे यासह काही जागांवरील उमेदवारांच्या नावावर पुन्हा चर्चा होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. बैठकीत 26 मतदारसंघांतील उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन काँग्रेस आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरी जाणार आहे. त्यासाठी मुंबईच्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्येक मतदारसंघातील तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली. 26 लोकसभा मतदारसंघांपैकी काही जागा वादग्रस्त असून तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. औरंगाबाद, पुणे यासह काही जागांवरील उमेदवारांच्या नावावर पुन्हा चर्चा होणार आहे. अंतिम निर्णयासाठी ही यादी दिल्लीला पक्षनेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे. संभाव्य उमेदवार - सोलापूर - सुशीलकुमार शिंदे वर्धा - चारुलता टोंकस दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा यवतमाळ - माणिकराव ठाकरे नांदेड - अमिता चव्हाण नागपूर - विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले चंद्रपूर - विजय देवतळे किंवा आशिष देशमुख शिर्डी - भाऊसाहेब कांबळे किंवा राजू वाघमारे नंदुरबार - के सी पाटील
आणखी वाचा























