एक्स्प्लोर
'तुमच्या डोक्यावरचे केस कमी झाले? राऊतांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो गाजताना दिसतोय. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत येत्या 25 आणि 26 जुलैला प्रसारित करणार आहेत.
मुंबई : 'एक शरद, सगळे गारद' या शरद पवारांच्या मुलाखतीनंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. शरद पवार यांची मुलाखत चांगलीच गाजली होती. सध्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो गाजताना दिसतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे त्यानिमित्तानं संजय राऊत हे दरवर्षी मुलाखत घेत असतात. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत येत्या 25 आणि 26 जुलैला प्रसारित करणार आहेत.
तुमच्या डोक्यावरचे केस कमी झाले? राऊतांचा बाऊंसर
शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास करत असताना तुमच्या डोक्यावरचे केस कमी झाले? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे हसले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा अनुभव सांगायला सुरुवात केली.
काय म्हणतंय ठाकरे सरकार? शरद पवारांनंतर संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांची मुलाखत
मुलाखतीत कुठले मुद्दे आहे?
गेल्या अनेक दिवसांपासून सर्व सामन्यांना पडलेले प्रश्न आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेली दिलखुलास उत्तर या मुलाखतीचं वैशिष्ट्य ठरलंय. मुख्यमंत्री पदाचा अनुभव, कोरोना, लाॅकडाऊन, महाविकास आघाडीतला असमन्वय, राम मंदिर, भाजपसोबत संबंध, सत्तापालट या विषयांवर उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह विरोधी पक्षाला देखील उत्सुकता असणार आहे की या मुलाखतीत काय काय उलगडे होणार आहेत.
भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. .पण आता पुन्हा महाराष्ट्रात भाजप सत्तापालट करेल, अशी शक्यता आहे. यावर देखील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना बोलतं केलंय. 'मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यांसमोर लोकं मरताना मी बघू शकत नाही' असं वक्तव्य करत लाॅकडाऊनच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिली आहेत.
तुम्ही मंत्रालयात का जात नाहीत?
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना हाच प्रश्न बेधडकपणे विचारला. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्यानं मंत्रालय भकास झालं आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजे?
विद्यार्थ्याच्या परीक्षांवरून महाराष्ट्रात चांगलंच घमासान पाहायला मिळालं. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्या त्या राज्यात परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. मग महाराष्ट्रात भाजपचा परीक्षा घेण्यासाठी हट्ट का? असा सवाल महाविकास आघाडीकडून विचारण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायाल मिळाला. पण या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आपलं परीक्षाबद्दलच मौन सोडलं आहे.
शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या
भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार
पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार
लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार
Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार
'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement