एक्स्प्लोर

Eknath Shinde: दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था; फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार

Eknath Shinde: दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत.

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.

या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत:
•  VTGSO – संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ
•  VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ

या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देवेंद्र फडणवीसही विविध यंत्रणांशी संपर्कात- (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने 'एक्स'वर माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. 

ही बातमीही वाचा:

Israel vs Iran Conflict: आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवली मोठी जबाबदारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget