एक्स्प्लोर
शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस, पण कर्तव्यात नाही : मुख्यमंत्री
![शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस, पण कर्तव्यात नाही : मुख्यमंत्री Cm Devendra Fadanvis Bjp Campaign Rally Live From Girgaon Mumbai शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस, पण कर्तव्यात नाही : मुख्यमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/10142120/CM.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेनेच्या भाषणात फक्त मराठी माणूस आहे, पण कर्तव्यात नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गिरगावमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
मराठी माणसांची काळजी करणाऱ्यांनी आजपर्यंत गिरगावकरांना पाणी का दिलं नाही, मराठी माणूस गिरगावातून हद्दपार का झाला? असे सवाल करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं. मराठी संस्कृती जपता जपता मराठी माणूस मागासलेला म्हणून ठेवला. जे मराठी माणसाला सोयी सुविधा देऊ शकले नाहीत, त्यांना मतं मागण्याचा अधिकार आहे का, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मेट्रो प्रकल्पासाठी गिरगावकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, त्यांना इथेच गिरगावात 120 फुटांऐवजी 500 चौरस फुटाचं घर बांधून देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
"राम मंदिर आमच्या मनात आहे, ते आम्ही अयोध्येत बांधून दाखवू, राम मंदिर रेल्वे स्टेशन आणि महापालिकेच्या निवडणुकीचा काय संबंध?" असा सवाल विचारत उद्धव ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. परवा ते म्हणाले, पाणी पिता ते आमचं आहे, उद्या टाटा पण म्हणतील मीठ माझं आहे. काय सुरु आहे, काय बोलतात, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाची फिरकी घेतली.
"आम्हाला महापालिकेत आपण एक व्हिजन घेऊन पुढे जायचंय, पण मुंबई महापालिकेची निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षाही वाईट होत आहे," असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या गिरगावातील सभेत म्हटलं आहे.
LIVE UPDATES :
- आम्ही मूळ गिरगावकरांना तुमच्या सारखं मुंबई बाहेर जावू देणार नाही
- तुमच्या भाषणामध्ये मराठी माणूस आहे, पण कर्तव्यामध्ये मराठी माणूस नाही
- मी मेट्रो आणली ती विकासासाठी, मेट्रोमुळे परिणाम होणाऱ्या पाचशे कुटुंबांना आम्ही याच गिरगावमध्ये घर बांधून देऊ, 120 फूट ऐवजी 500 स्वे. फूटांचं घर देऊ
- मराठी माणसाला सोयी सुविधा देवू शकले नाही, तर तुम्हाला मत मागायचा अधिकार तरी आहे का?
- मराठी संस्कृती जपता जपता मराठी माणूस मागासलेला म्हणून ठेवला गेला.
- राम मंदीर आमच्या मनात आहे ते आम्ही अयोध्येत बांधून दाखवू, राम मंदिर रेल्वे स्टेशन आणि पालिकेच्या निवडणूकीचा काय संबंध
- रस्ते का खराब होतात याची चौकशी केली तर 2445 कोटींची रस्त्यांमध्ये क्रस्ट लेअर टाकण्यात आले नाहीत अशी बाब समोर आली
- आता महानगरपालिका आमच्या हातात देणार आहात, त्यामुळं गिरगावकरांना गिरगावमध्येच मोठं घर मिळेल, तसा विकास आराखडा आम्ही आणू
- 70 लाख प्रवाशांची क्षमता लोकलची आहे आता मेट्रोची 70 लाख क्षमता करणार आणि 30 लाख क्षमतेचे एलीव्हेटेड कॉरीडॉर करु
- दर वर्षी तेच ते रस्ते करतो कारण आम्हाला मुंबईतला कंत्राटदार पोसायचे आहे, त्याचा मलिदा खायचा आहे
- तुमच्या भाषणात मराठी माणूस आहे पण कृतीत मराठी माणूस नाही.. बीडीडी चाळीत 500 चौरस फुटाच घर आम्ही देणार -मुख्यमंत्री
- परवा म्हणाले पाणी पिता ते आमचं आहे. उद्या टाटा पण म्हणतील मीठ माझं आहे. काय सुरुये. काय बोलतात : मुख्यमंत्री
- आम्हाला महापालिकेत आपण एक व्हिजन घेवून पुढे जायचंय, पण मुंबई पालिकेची निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षाही वाईट होत आहे. : मुख्यमंत्री
- आरएसएसची पहिली शाखा याच गिरगावात सुरु झाली होती, म्हणून या भूमीला मी वंदन करतो : मुख्यमंत्री
- मराठी माणसांची काळजी करणाऱ्यांनी आजपर्यंत गिरगावकरांना पाणी का दिलं नाही : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)