एक्स्प्लोर
1 मेपर्यंत संपूर्ण मुंबईत वायफाय, मुख्यमंत्र्यांची विधानभवनात घोषणा
मुंबई: लवकरच मुंबईकरांना पोकीमोन गो खेळण्यासाठी आणि मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी नेट पॅकवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण 1 मे 2017 पर्यंत संपूर्ण मुंबईला वाय-फाय हॉटस्पॉट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे.
ज्या प्रमाणे संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नेटवर्क उभारलं त्या प्रमाणे मुंबईत 1200 ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट तयार करण्यात येणार आहेत. 1200 पैकी 500 वायफाय हॉटस्पॉट 1 नोव्हेंबरपर्यंत उलब्ध होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुढच्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची वायफाय नेटवर्कची घोषणा महत्त्वाची मानली जाते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement