एक्स्प्लोर

मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत: जेल प्रशासन

मुंबई: भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी जेल प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात आला. मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, असा दावा जेल प्रशासनाने केला आहे. याच जेलमधील कैदी इंद्राणी मुखर्जीने कालच कोर्टात धक्कादायक माहिती दिली होती. मंजुळावरही निर्भयासारखेच अत्याचार झाले होते, असा दावा इंद्राणीने कोर्टात केला होता. मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप   भायखळा जेलप्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीनं कोर्टासमोर केला. गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणींनं कोर्टासमोर सांगितलं. “भायखळा जेलमधल्या घटनेनंतर जेल प्रशासनाने महिला कैद्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले होते. तेव्हा लाठीचार्जसाठी महिलांसह पुरुष स्टाफही सहभागी झाला होता.”, अशी माहितीही इंद्राणी मुखर्जीने कोर्टात दिली. दरम्यान, मंजुळा शेट्ये प्रकरणाचं नेमकं सत्य लवकरच बाहेर येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महिला आयोगाकडून गंभीर दखल मुंबईतल्या भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे.  याबाबत राज्य महिला आयोगानं सुमोटो तक्रार दाखल केली आहे. तसेच, जेल अधीक्षकांना येत्या 29 तारखेला अहवाल घेऊन हजर राहण्यासही सांगितलं. काय आहे नेमकं प्रकरण? भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये  या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.  दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे. संबंधित बातम्या भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार  मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप   महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखल 

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget