एक्स्प्लोर
पाणीपुरवठा प्रकल्पाच्या निधीतून सनदी आधिकाऱ्याच्या बंगल्याची दुरुस्ती
मुबंई : मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या बंगल्याची कोट्यवधीची दुरुस्ती पाणीपुरवठा प्रकल्पाच्या निधीतून झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिका प्रशासनाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी जल अभियंता कार्यालयाकडे अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ संजय मुखर्जी आणि पल्लवी दराडे यांच्या बंगल्यावर झालेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. माहिती अधिकाऱ्यांनी यावर मुखर्जी राहत असलेला निवासस्थान गेस्ट हाऊस होते आणि पालिका आयुक्तांच्या परवानगीने त्यांस जानेवारी 2015 रोजी देण्यात आले असल्याचे कळवले.
एकूण 2682 चौरस फुटाच्या या बंगल्यावर जानेवारी 2015 पासून 1 कोटी 44 हजार 679 रुपये आणि 30 पैसे दुरुस्तीवर खर्च करण्यात आले आहे. तर वर्ष 2015-16 या कालावधीत 92 हजार 234 रुपये वीज खर्च करण्यात आलेला आहे. डॉ मुखर्जी यांच्या येण्यापूर्वी वर्ष 2011 ते वर्ष 2014 या 4 वर्षांच्या कालावधीत फक्त 89 हजार 705 रुपये खर्च झाले असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यालयाकडून देण्यात आली.
तर दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिनांक 10 जून 2016 रोजीच्या पत्राने अनिल गलगली यांस त्यांच्या बंगल्यावर झालेल्या खर्चाची कोणतीही माहिती देण्यास आक्षेप घेतला आहे. पल्लवी दराडे यांनी दावा केला आहे की, ही माहिती त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित आहे आणि यामुळे त्यांची माहिती देऊ नये.
अनिल गलगली यांनी अश्याप्रकारे निवासस्थानावर होणारा कोट्यावधी रुपयांच्या खर्चावर आश्चर्य व्यक्त करत पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे की जल अभियंताचा बंगला अतिरिक्त आयुक्तांस देण्याची चुकीची प्रथा बंद करावी, आणि कोटयावधीचा खर्च ज्या पाणीपुरवठा प्रकल्पातून करण्यात आला आहे, त्यास जबाबदार असलेल्या अधिकारी वर्गावर कारवाईची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement