एक्स्प्लोर
Advertisement

बनावट पास करून 'बेस्ट'ला लाखो रुपयांचा चुना, पाच जणांच्या टोळीला अटक
29 ऑक्टोबर रोजी बेस्ट प्रशासनाचे निरीक्षक राम शिंदे हे बेस्टच्या नवजीवन सोसायटी आर सी रोड ते कुर्ला या बस मार्गावर बस क्रमांक 369 मध्ये प्रवाशांचे तिकीट आणि बसपास तपासणी करीत असताना प्रवासी पाशा शेख याचा बस पास हा बनावट असल्याचा त्यांना संशय आला.

मुंबई : बेस्ट बसचे बनावट पास तयार करून बेस्ट प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाच जणांच्या टोळीला चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुन्या प्रवाशांच्या डेटावर ही टोळी बेस्ट बसचे मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक नकली पास तयार करून लाखो रुपये कमवीत होती.
या गुन्ह्यात चेंबूर पोलिसांनी अनिकेत जाधव हा ट्रायमॅक्स कंपनीचा कर्मचारी तसेच पाशा शेख आणि अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशाल पाटील या एजंट म्हणून काम करणाऱ्यांना अटक केली आहे. 29 ऑक्टोबर रोजी बेस्ट प्रशासनाचे निरीक्षक राम शिंदे हे बेस्टच्या नवजीवन सोसायटी आर सी रोड ते कुर्ला या बस मार्गावर बस क्रमांक 369 मध्ये प्रवाशांचे तिकीट आणि बसपास तपासणी करीत असताना प्रवासी पाशा शेख याचा बस पास हा बनावट असल्याचा त्यांना संशय आला.
बेस्टच्या कंडक्टरकडे असणाऱ्या मशीन मध्ये फक्त पासची वैधता तारीख तपासता येत असल्याने हा पास नक्की कोणाचा हे कळत नाही. त्यामुळे त्यांनी या प्रवाशाला कुर्ला बस आगारात आणले. त्या ठिकाणी या पासची रिचार्ज करणाऱ्या मशीनवर तपासणी केली असता हा पास बनावट असल्याचे समोर आले.
निरीक्षक राम शिंदे यांनी ताबडतोब चेंबूर पोलीस ठाणे गाठून याबाबत गुन्हा नोंदवून या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात घेतले. या प्रवाशाकडून माहिती मिळवून पोलिसांनी या संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून आतापर्यंत तीनशे ते चारशे बनावट पास बनविलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु आता यामुळे बेस्ट प्रशासनाने कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
भंडारा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
