एक्स्प्लोर
बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरीचा मार्ग सुकर
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी देण्यासाठी प्राधान्य द्यावं, याबाबत शिवसेनेने मागणी केली होती.
मुंबई : बीएमसीच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सरकारी नोकरी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या नोकरभरतीत प्राधान्य मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी देण्यासाठी प्राधान्य द्यावं, याबाबत शिवसेनेने मागणी केली होती. शाळा अर्धवट सोडण्यापासून विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी सेनेने हा उपाय योजला होता.
महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या मुलांना पालिका सेवेत प्राधान्य देण्याबाबतचा निर्णय झाल्यामुळे पाल्यांना पालिकेच्या शाळेत दाखल करण्याचा पालकांचा कलही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिवसेनेच्या मागणीला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होईल, अशी खात्री व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि शालाबाह्य मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, ही दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला.
शिक्षणाची आवड आणि दर्जा सुधारावा, यासाठी माजी विद्यार्थ्यांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमण्यात येणार आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. आयुक्त या निर्णयाला मंजुरी देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement