एक्स्प्लोर
VIDEO : वसईत भर चौकात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण
सिग्नल तोडल्याने पावती फाडण्यास सांगितल्याने बाचाबाची, ट्राफिक पोलिसाला मारहाण
![VIDEO : वसईत भर चौकात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण Attacked On Traffic Police In Vasai Latest Updates VIDEO : वसईत भर चौकात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/10123300/vasai-police-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वसई (ठाणे) : ट्रॅफिक पोलिसाला मारहाणीची घटना वसईत घडली आहे. काळू विठ्ठल मुंडे असे या पोलिसाचे नाव आहे. वसईतील पार्वती क्रॉस परिसरात सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोहेल मेनन अस मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
सोहेल याची सिग्नल तोडण्यावरुन पोलिसांशी बाचाबाची झाली आणि त्याने चक्क पोलिसाच्या श्रीमुखात लगावली. एकदा मारहाण करुन आरोपी सोहेल शांत झाला नाही, तर तो वारंवार मारहाण करत होता.
धक्कादायक बाब म्हणजे भर चौकात इतकी गर्दी असताना एकही व्यक्ती पोलिसाला बचावण्यासाठी पुढे सरसावला नाही. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे, मनिकपूर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा अशी नोंद केली असून, अजूनही मारहाण करणारा आरोपी मोकाट आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)