Antilia case : स्फोटकांसह मिळालेल्या स्कार्पिओ प्रकरणात दहशतवादी अँगल नाही, टेलिग्रामवरील मॅसेज खोडसाळपणा!
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकरणात दहशतवादी अँगल नसल्याची माहिती समोर आली आहे.
![Antilia case : स्फोटकांसह मिळालेल्या स्कार्पिओ प्रकरणात दहशतवादी अँगल नाही, टेलिग्रामवरील मॅसेज खोडसाळपणा! Antilia case There is no terrorist angle in the Scorpio case found with the explosives Antilia case : स्फोटकांसह मिळालेल्या स्कार्पिओ प्रकरणात दहशतवादी अँगल नाही, टेलिग्रामवरील मॅसेज खोडसाळपणा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/14/110caddfcbe6f4ed3872b559dc068e70_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती? त्या गाडीचा वापर कधी आणि कोणी केला या सर्वांत संदर्भात अजूनही वेगवेगळ्या चर्चा आहेत. अशात या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकरणात दहशतवादी अँगल नसल्याची माहिती समोर आली आहे.
टेलिग्रामवरील मॅसेज निव्वळ खोडसाळपणा आहे, अशी माहिती NIA ला दिल्ली स्पेशल सेलने दिली आहे. मात्र गाडी कारमायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अस्पष्ट असल्याचं स्पेशल सेलनं म्हटलं आहे. जैश उल हिंद नावाच्या कोणत्याही संघटनेचा या प्रकरणात सहभाग नाही, असंही सेलनं सांगितलं आहे.
अंबानींच्या घरासमोर स्फोटकांसह मिळालेल्या 'त्या' स्कॉर्पिओबद्दल मोठी माहिती समोर
काय माहिती आली होती समोर
या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याची माहिती मिळाली होती. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडून दिल्लीच्या तिहार जेलमधून एक फोन जप्त केला होता. तहसीनजवळ जो मोबाईल मिळाला आहे त्यात एक टेलिग्राम चॅनल अॅक्टिवेट केला होता. टोर ब्राऊजरवरुन डार्क नेटवर व्हर्चुअल नंबर क्रिएट केला गेला होता. त्यावरुनच एंटीलियाजवळ स्फोटकं आणि त्यानंतर धमकीबाबतची पोस्ट तयार केली होती. या प्रकरणी स्पेशल सेलकडून तहसीनची चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती होती.
Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम
काय आहे स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये
स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर तपास करणाऱ्या फॉरेंसिक टीमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आहेत. या कारसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरण यांची ही स्कॉर्पिओ कार 17 फेब्रुवारी रोजी इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवरुन चोरी झाली होती. ज्याची तक्रार हिरण यांनी विक्रोळी पोलिसात केली होती. फॉरेंसिक रिपोर्टनुसार, हायवेवरुन ज्यावेळी ही कार चोरी झाली त्यावेळी त्या कारचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी कुठलीही छेडछाड, तोडफोड केलेली नाही. तसेच कुठलेही निशाण मिळालेले नाहीत. याचा अर्थ असा की कार चोरी करणाऱ्या व्यक्तिनं अगदी सहजपणे ही कार त्या ठिकाणाहून चोरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)