एक्स्प्लोर

अंबानींच्या घरासमोर स्फोटकांसह मिळालेल्या 'त्या' स्कॉर्पिओबद्दल मोठी माहिती समोर

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. आता या स्कॉर्पिओबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती? त्या गाडीचा वापर कधी आणि कोणी केला या सर्वांत संदर्भात अजूनही वेगवेगळ्या चर्चा आहेत. अशात आता या स्कॉर्पिओबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

काय आहे स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 
स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर तपास करणाऱ्या फॉरेंसिक टीमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आहेत. या कारसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरण यांची ही स्कॉर्पिओ कार 17 फेब्रुवारी रोजी इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवरुन चोरी झाली होती. ज्याची तक्रार हिरण यांनी विक्रोळी पोलिसात केली होती.  फॉरेंसिक रिपोर्टनुसार, हायवेवरुन ज्यावेळी ही कार चोरी झाली त्यावेळी त्या कारचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी कुठलीही छेडछाड, तोडफोड केलेली नाही. तसेच कुठलेही निशाण मिळालेले नाहीत. याचा अर्थ असा की कार चोरी करणाऱ्या व्यक्तिनं अगदी सहजपणे ही कार त्या ठिकाणाहून चोरी केली होती.  

Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम

स्कॉर्पिओ गाडीचं रहस्य सुटण्याऐवजी आणखीच किचकट होत चाललं आहे. स्कॉर्पिओ गाडी संदर्भात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. ही स्कॉर्पिओ गाडी सहा महीने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी वापरल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं. तसंच गाडीचे मूळ मालक सॅम नावाची व्यक्ती असून मनसुख हिरण आणि सचिन वाझे यांची आधीपासूनच ओळख असल्याचं सांगितलं.

नेमकं कसं आहे गाडीचे रहस्य आणि कोणते प्रश्न निर्माण होतात?

- स्कॉर्पिओ गाडीचे खरे मालक सॅम न्यूटन नावाची व्यक्ती आहे.

- गाडीच्या रिपेअरिंगचं काम करण्यासाठी सॅम न्यूटन यांनी गाडी मनसुख हिरण यांना दिली होती.

- मात्र 2018 मध्ये गाडीच्या रिपेअरिंगचं बिल 1 लाख 75 हजार रुपये बिल झालं, जे सॅम न्यूटन यांनी दिलं नाही. त्यामुळे मनसुख यांनी ती स्कॉर्पिओ स्वत:कडेच ठेवून घेतली.

- क्राईम ब्रान्चला दिलेल्या जबाबात मनसुख यांनी सांगितलं होतं की, 7 फेब्रुवारी रोजी मनसुख मुंबईला येत होते, मात्र त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग लॉक झालं आणि गाडी हायवेलाच त्यांनी उभी केली.

- मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा गाडी घेण्यासाठी तिथे गेलो तेव्हा गाडी तिथे नव्हते, असं मनसुख यांनी सांगितलं.

- आता प्रश्न असा उपस्थित होतोय की मनसुख हिरण यांनी त्याच वेळेला मेकॅनिक बोलून त्यांची गाडी रिपेअर का करुन घेतली नाही.

- तर मनसुख हिरण यांच्या पत्नीने ही गाडी गेल्या चार महिन्यांपासून सचिन वाझे वापरत होते असा आरोप केला, जे सचिन वाझे यांनी फेटाळले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी जिथे उभी होती तिथून दोन तासांनंतर म्हणजे नऊच्या सुमारास ही गाडी कांजुर मार्ग इथून यूटर्न येऊन मुलूंड टोलनाका क्रॉस करताना दिसली आणि दुसऱ्याच दिवशी मनसुख यांनी स्वत: गाडी हरवल्याची तक्रार दिली.

त्यामुळे 7 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत ही गाडी कुठे होती? कोणी वापरली? आणि 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर हे गाडी आणून कोणी ठेवली? हे काही विचार करणारे प्रश्न उपस्थित होत आहेत. स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचं रहस्य उलगडून या प्रकरणाचा तपास आता एनआयएला करायचा आहे, ज्याची सुरुवात एनआयएने केली असून लवकरच याचा छडा लागण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
×
Embed widget