एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'फ्लिपकार्ट'वर 31 हजारांचा कॅमेरा मागवला, पाठवला 'निरमा' साबण
अंबरनाथ : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'वरुन कॅमेरा मागवणाऱ्या ग्राहकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅमेराच्या बॉक्समध्ये चक्क निरमा साबण निघाल्याचं अंबरनाथमध्ये समोर आलं आहे.
अंबरनाथच्या लोकनगरी भागात राहणाऱ्या तरुणाची 31 हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. कुरियर कंपनीसह फ्लिपकार्टनंही या प्रकरणी हात वर केले आहेत. त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न या तरुणाला पडला आहे.
एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या किरण पाटेचा धाकटा भाऊ अक्षयला फोटोग्राफीत करियर करायचं आहे. त्यासाठी किरण आणि त्याच्या परिवारानं गुढीपाडव्याच्या दिवशी फ्लिपकार्टवरुन एसएलआर कॅमेरा बुक केला. सोबतच फायनान्स कंपनीच्या कार्डवरुन 31 हजार रुपयांचा भरणाही केला.
किरणच्या घरी कॅमेराची डिलीव्हरी घेऊन आलेला कुरिअर बॉय अत्यंत घाई गडबडीत पार्सल सोपवून निघून गेला. यावेळी त्यानं सहीसुद्धा घेतली नाही, असा दावा किरणने केला आहे.
संबंधित तरुणाशी नंतर संपर्क साधला असता, त्याने आपल्याच मुलाला धमक्या दिल्याचा आरोप किरणच्या आई मंदा पाटे यांनी केला आहे. त्यामुळे आपले पैसे परत मिळणार का, हा प्रश्न सध्या पाटे कुटुंबाला भेडसावत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement