एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2018
1. नोकर भरतीत मराठा समाजातील मुलांना 16 टक्के जागा राखीव, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, मात्र, आरक्षण कोर्टाच्या अखत्यारित असल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/GT8eez
2. मराठा क्रांती मोर्चाचा परळी, बीडनंतर नवी मुंबईत ठिय्या, वारी हे आंदोलनाचं ठिकाण नाही, 900 वर्षांच्या परंपरेला गालबोट न लावण्याचं मुख्यमंत्र्याचं आवाहन https://goo.gl/A5mUZL
3. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू करणार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, सरकारी तिजोरीवर 21 हजार 530 कोटींचा बोजा पडणार https://goo.gl/Rbf1pU
4. दूध दरवाढीच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता, नेते आणि दूधसंघांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक सुरु, खासदार राजू शेट्टींचीही चर्चेची तयारी https://goo.gl/YxwKn8
5. स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाचा चौथा दिवस, अनेक जिल्ह्यात जनावरं रस्त्यांवर आणून रास्तारोको, तर पुण्यात चितळे आणि कात्रजचं दूध संकलन बंद https://goo.gl/5ipYGJ
6. स्कूल बस उद्या बंद, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून एकदिवसीय संपाची हाक, विविध मागण्यांसाठी टेम्पो-ट्रकसह, खासगी कॅबही बंद राहणार https://goo.gl/jynm4c
7. अविश्वास प्रस्तावावर शिवसेना मोदी सरकारच्या पाठीशी, विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व खासदारांनी हजर राहा, शिवसेनेकडून व्हीप जारी, नेत्यांची अवस्था मात्र तळ्यातमळ्यात https://goo.gl/9XFvpT
8. मुंबईतल्या शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचं उघड, केंद्रीय पर्यावरण खात्याच्या अंतिम परवानगीवेळी आराखड्यात बदल, शिवसेनेचा भाजपला घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांकडून खंडन https://abpmajha.abplive.in/
9. दंगलीमुळे ‘विप्रो’कडून औरंगाबादमधील अडीच हजार कोटींचा प्रकल्प रद्द, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा, राम मंदिर, ईव्हीएमवरुनही भाजपवर टीकास्त्र https://goo.gl/rbsJjx
10. औरंगाबादमध्ये सत्ताधारी शिवसेनेचंच कचराकोंडीवरुन आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन ट्रक कचरा ओतला, प्रशासनाचा निषेध https://goo.gl/5uNfDn
11. मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका, मुंबईतील दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ, येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता https://goo.gl/7CHj5G
12. शनी शिंगणापूर मंदिर आता सरकारच्या ताब्यात, विधानसभेत विधेयक मंजूर https://goo.gl/gYinXn
13. पुणे-मुंबई प्रवासादरम्यान मराठी वृत्तवाहिनीच्या निवेदकाला लुटलं, बंदुकीचा धाक दाखवून 41 हजाराला लुबाडलं, महिन्याभरात लुटीची पाचवी घटना https://goo.gl/Leyne6
14. लवकरच 100 रुपयांची नवी नोट चलनात, आरबीआयकडून घोषणा, शंभराची जुनी नोटही चलनात राहणार https://goo.gl/XKL2KH
15. कॅन्सरशी लढा देणाऱ्या सोनाली बेंद्रेचा मुलासोबतचा फोटो इन्स्टावर, मुलाला आजाराबद्दल सांगतानाची भावना प्रकट https://goo.gl/oTsRCJ
BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी सागर शिंदे यांचा ब्लॉग - ... तरीही 'एलफिन्स्टन' मुंबईकरांच्या लक्षात राहील https://goo.gl/5Cm3ke
माझा विशेष : अविश्वास प्रस्ताव म्हणजे विरोधकांचं हात दाखवून अवलक्षण? पाहा विशेष चर्चा 9 वाजता एबीपी माझावर
एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement