एक्स्प्लोर
मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीतून 28 मुलांची सुटका
मुंबई: मुंबईतल्या कांदिवलीत २८ मुलांची सुटका करण्यात आली आहे. कांदिवलीतल्या उच्चभ्रू अशा ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका बंगल्यात या मुलांचं शोषण केलं जात असल्याचं समोर आलं आहे.
सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी १२ मुलं ही अल्पवयीन असल्याची माहिती मिळते आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता पोलिसांनी छापा मारून या मुलांची सुटका केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चारही बाजूंनी हिरव्या कापडानं बंद असलेल्या या बंगल्यात मुलांना दिवसरात्र पूजा-अर्चा जप-जाप्य करण्यास बळजबरी केली जायची. त्यांचं शारीरिक शोषण व्हायचं. तसेच त्यांना मारहाणही केली जायची.
एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यानं दिलेल्या तक्रारीनंतर या मुलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी अजून कोणाला अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement