एक्स्प्लोर
Advertisement
१९ वर्षीय तरुणाकडून २७ लाखांचं परकीय चलन जप्त
कल्याणजवळील उल्हासनगर रेल्वे स्थानकात एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं आहे.
उल्हासनगर : कल्याणजवळील उल्हासनगर रेल्वे स्थानकात एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं आहे. पियुष कलवानी असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे.
आज (मंगळवार) दुपारी पियुष उल्हासनगर रेल्वे स्थानकात आला असताना रेल्वे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या चपलेतून आणि बॅगच्या हँडलमधून डॉलर्सचा अक्षरशः खच पडला. यात अमेरिकन डॉलर, सिंगापूर डॉलर आणि कतारच्या चलनाचा समावेश आहे.
या नोटा आपण ठाणे इथून एका इसमाकडून घेऊन नागपूरला नेत असल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मात्र सकाळी साडेनऊ वाजता त्याला पकडून कल्याण जीआरपी कार्यालयात नेल्यानंतर संध्याकाळपर्यंत साधा पंचनामाही झालेला नसल्याची बाब समोर आली.
दुसरीकडे ठाण्याहून नागपूरला जाताना हा तरुण उल्हासनगरात कशाला आला? याचा देखील तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणात उल्हासनगरमधील काही मध्यस्थ हस्तक्षेप करत असल्यानं उल्हासनगर शहरातला एखादा मोठा सूत्रधार यामागे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र या सगळ्याचा तपास आता ईडीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement