एक्स्प्लोर
प्रेयसीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या, विरारमधल्या हत्येचं गूढ उकललं

विरार: विरारमध्ये आढळलेल्या तरुणीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवारी या तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. सुरुवातीला मुलीचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलीस साशंक होते. त्यानंतर पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली. मिळालेल्या माहितीनूसार आरोपी देवेंद्र भोसलेने पीडित तरुणीला आपल्यासोबत फिरायला नेलं. यानंतर तिच्यावर बलात्कार करुन पाण्यात बुडवून तिची हत्याही केली. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह तिच्याच सोसयटीजवळ आणून टाकला. 24 वर्षीय देवेंद्र भोसलेचं या 19 वर्षीय तरुणीवर प्रेम होतं. मात्र, मैत्रिणीला दुसऱ्यासोबत फिरताना बघितल्यानं त्याला राग आला. त्यानंतर आरोपीनं प्रेयसीला तुंगारेश्वर इथं नेलं आणि तिथंच तिची हत्या करुन नंतर मृतदेह तिच्या सोसायटीबाहेर टाकून दिला होता. संबंधित बातम्या:
दुसऱ्या तरुणासोबत फिरताना पाहिल्यानं प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























