एक्स्प्लोर

अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू

कमला मिल कंपाऊंडमधल्या आगीत जीव गमावलेल्यांचा मृत्यू हा अपघाती नाही तर ही एक हत्याच आहे. निष्काळजीपणाच्या हत्याराने केलेली हत्या, व्यवस्थेनं केलेली हत्या...

  मुंबई : मुंबईतल्या अग्नितांडवात गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याच एका प्रश्नानं डोकं वर काढलं आहे की, ही दुर्घटना टाळता आली असती का? या प्रश्नाचं उत्तर आहे. हो... नक्कीच टाळता आली असती. पण राजकीय अनास्था, अधिकाऱ्यांची बेफिकिरी आणि कायद्याला खिशात घेऊन फिरणारे लोक. यामुळे हा अपघात अटळ ठरला. वारंवार केलेल्या तक्रारींकडे जरा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असतं तर आज 14 जण आपल्या प्राणांना मुकले नसते. स्थानिकांनी केलेल्या तक्रारींची दखल महापालिकेनं घेतली असती तर लोअर परळच्या वन अबव्ह पबमध्ये लागलेल्या आगीचे हे लोळ कदाचित उठलेच नसते. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कमला मिल कम्पाऊंडमधल्या यच्चयावत हॉटेल्सबाबत माहिती काढून महापालिकेला वारंवार कल्पना दिली होती. पण अधिकाऱ्यांनी फक्त एक पत्र पाठवून. इथे कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा केला. या गोष्टींकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं? - महापालिकेनं केलेल्या तपासणीमध्ये काहीच अव्यवस्था कशी आढळली नाही? - महापालिकेनं प्रत्येक हॉटेलचं फायर ऑडिट पाहिलं होतं का? - अनधिकृत रुफ टॉप हॉटेल्स महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कसे दिसले नाहीत? - आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठीच्या उपाययोजना नव्हत्या हे अधिकाऱ्यांना कसं दिसलं नाही? - आग विझवण्याच्या यंत्रणा पुरेशा नव्हत्या, हेही अधिकाऱ्यांना का दिसलं नाही? - कमला मिलमध्ये अग्निशमन दलाची गाडी दाखल होण्यासाठी जागा नाही, हे अधिकाऱ्यांना का दिसलं नाही? त्यामुळे कमला मिल कंपाऊंडमधल्या आगीत जीव गमावलेल्यांचा मृत्यू हा अपघाती नाही तर ही एक हत्याच आहे. निष्काळजीपणाच्या हत्याराने केलेली हत्या, व्यवस्थेनं केलेली हत्या... काय आहे प्रकरण? हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. संबंधित बातम्या : कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं मुंबईतील लोंढे आवरा: हेमा मालिनी  ‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’ हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित 1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील कमला मिल्स आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! कमला मिल्स आग : आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget