FYJC Online Admission : अकरावी प्रवेशाचा दुसरा राऊंड सुरु, अजूनही एक लाख विद्यार्थी कॉलेजच्या प्रतीक्षेत
FYJC Online Admission : अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या यादीसाठी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होईल. प्रथम वर्ष ज्युनिअर कॉलेज प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी शनिवारी संपली.
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या (FYJC Online Admission) पहिल्या गुणवत्ता यादीनंतर आता दुसऱ्या गुणवत्ता यादीची विद्यार्थ्यांना (Students) प्रतीक्षा आहे. दुसऱ्या यादीसाठी पसंती क्रमांक देण्यासाठी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांनी अर्जाच्या भाग दोन मध्ये कॉलेज पसंती क्रमांक द्यायाचा आहे. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी होणार आहे.
12 ते 17 ऑगस्ट दरम्यान, दुसरी गुणवत्ता यादीत मिळालेले कॉलेज निश्चित करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये फक्त 58 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत. तर जवळपास 1 लाख विद्यार्थी अजूनही कॉलेज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या यादीसाठी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होईल. प्रथम वर्ष ज्युनिअर कॉलेज प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी शनिवारी संपली. ज्या उमेदवारांनी राऊंड प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली, त्यांना जागा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी दहा वाजल्यापासून ऑप्शन फॉर्म पार्ट 2 कॅप ऑप्शन फिलिंगला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे निवडलेल्या आणि प्रतीक्षा यादीतील दोन्ही विद्यार्थ्यांच्या यादीनुसार कोटानिहाय प्रदर्शन जाहीर केले जाईल. त्याचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ
एच आर कॉलेज, चर्चगेट
कॉमर्स - 93%
एन एम कॉलेज
कॉमर्स - 93.6%
सेंट झेविअर्स कॉलेज
आर्टस् - 94.2%
सायन्स -89.6%
रुईया कॉलेज
आर्टस् - 91.4%
सायन्स- 92.4%
मिठीबाई कॉलेज
आर्टस् - 87.6%
कॉमर्स - 90.8%
सायन्स- 89%
पोदार कॉलेज
कॉमर्स - 92.4%
के सी कॉलेज
आर्टस् - 85.6%
कॉमर्स - 90.8%
सायन्स - 88.2%
जय हिंद कॉलेज
आर्टस् - 90.2 %
कॉमर्स - 91%
सायन्स - 87.4%
महत्वाच्या बातम्या
FYJC Online Admission : मुंबईत अकरावी प्रवेशासाठी अजूनही जवळपास एक लाख विद्यार्थी कॉलेजच्या प्रतीक्षेत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI