(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mard doctor Organization : सरकारनं आश्वासन पूर्ण केलंच नाही; राज्यातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा संपाची हाक
Mard doctor Organization : सरकारने बैठीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी राज्यभर जाणार डॉक्टर संपावर जाणार आहेत.
Mard doctor Organization : सरकारने बैठीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी राज्यभर जाणार डॉक्टर संपावर जाणार आहेत. यापूर्वी 7 फेब्रुवारीला संपाची हाक दिली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टरांसोबत बैठक घेत त्यांचा मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन आठवडे उलटले तरी मागण्याबाबत सरकार विचार करत नसल्याने डॉक्टरांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय. 22 तारखेपासून अत्यावशक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ शकतात
काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि एमबीबीएसची पदवी पूर्ण केलेल्या डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असते. शिवाय पदव्युत्तर शिक्षणही आवडत्या विषयात घेण्याचा डॉक्टरांचा कल असतो. राज्यात दरवर्षी 4 हजारांच्या आसपास डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेतात. मात्र, शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यावेतन, वसतिगृहातील व्यवस्था, सुरक्षा याबाबत डॉक्टरांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. डॉक्टरांच्या समस्या अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारकडून त्यांच्या समस्यांवर कोणताच तोगडा काढण्यात आलेला नाही.
संपाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हणजेच मार्डने अखेर संपाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मार्डने संप आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या काही मागण्या पूर्ण देखील करुन घेतल्या आहेत. शिवाय, काही समस्यांबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सरकारकडून ही आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत.
चांगले प्राध्यापक मिळत नाहीत
पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वारेमाप फी आकारण्यात येते. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना प्रवेश मिळतो. मात्र, मात्र अनेक वेळा चांगले शिक्षण देणारे प्राध्यपक विद्यार्थ्यांना मिळत नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. शिवाय, प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना धाकात ठेवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता. त्यामुळे प्राध्यापकांना पदावरुन हटवण्याच्या मागण्या देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी राज्यभर जाणार डॉक्टर संपावर जाणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या