Narayan Rane : राज्यसभेला पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही, पण तरीही..! नारायण राणेंच्या मनात नेमकं काय?
Narayan Rane : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेचे रिंगणात असतील की नाही? याची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी : राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील सर्व निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर घेतील अशी सूचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिली. त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेचे उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेचे रिंगणात असतील की नाही? याची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरीच्या जागेवर भाजपचाच दावा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोकणामध्ये रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत आणणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केल. रिफायनरी रत्नागिरीत यावी यासाठी मी प्रयत्नशील असून संबंधितांशी बोलली सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये आम्ही सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न करू, 48 पैकी किती जागा जिंकू असे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या