एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 3 | राज्यात लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता; काय सुरु होणार? काय बंद राहणार?
रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना लॉकडाऊनमध्ये झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्यानुसार रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
रेड झोन
- बस, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार
- सलून बंद राहणार
- ग्रामीण भागातील सर्व दुकाने नियम पाळून खुली करण्याचा निर्णय
- मात्र ग्रामीण भागातील मॉल सुरू होणार नाही
- रेड झोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, MMR, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व प्रकारची दुकान सुरू होणार
- वरील महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
- सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
- बस वाहतूक बंद राहणार
- टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू होणार
- एक वाहक आणि दोन प्रवासी अशी परवानगी
- खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
- सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
- त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
- अत्यावश्यक सेवांसह आता इतर दुकान सुरू होणार (मॉल सोडून)
- सगळं सुरु करायला परवानगी
- 50 टक्के प्रवासी क्षमतेने ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू होणार
- बसच्या फेऱ्या ग्रीन झोनमध्येच असणार त्याच्या क्षेत्राबाहेर बस जाणार नाही
- खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
- सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
- तर त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
संबंधित बातम्या
- 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
- लॉकडाऊनमधलं आगळं वेगळं लग्न, पुणे पोलिसांनी केलं कन्यादान
- नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोना; शहरातील गुरुद्वारा, लंगर साहिब परिसर सील
Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement