Coronavirus | नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोना; शहरातील गुरुद्वारा, लंगर साहिब परिसर सील
नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमधील गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
नांदेड : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 741 वर पोहोचला आहे. दरम्यान याआधीही नांदेडहुन पंजाबमध्ये परतलेल्यांपैकी काही जणांना कोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. गुरुवारी त्यातील 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खाल्लाळ यांनी माहिती दिली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी होणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात राहणाऱ्या 97 व्यक्तींचा स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यातील 20 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यातील 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलं आहेत. तर 11 जणांचे अहवाल येणं बाकी आहे. या व्यक्तींना एनआरआय भवन कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुर्वीचे 6 रूग्ण आणि नव्याने आढळून आलेले 20 रूग्ण असे एकूण 26 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.
गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे 2 वाहन चालक आणि त्यांचा 1 मदतनीस यांचाही स्वॅब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. हे वाहन चालक आणि मदतनीस गुरुवार 23 एप्रिल रोजी पंजाब येथे जाऊन मंगळवार 28 एप्रिल रोजी परत आले होते. त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच अडवून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. या तीन व्यक्तींचे बुधवार 29 एप्रिल 2020 रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आज (शनिवार) 2 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 235 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे अहवाल घेण्यात आलेल्या एकूण 1 हजार 120 स्वॅबपैकी 1 हजार 9 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 65 जणांचा अहवाल येणं बाकी आहे. आतापर्यंत 5 जणांच्या स्वॅब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच 14 जणांचा निष्कर्ष निघालेला नाही. सध्या पूर्वीचे 6 रुग्ण आणि नव्याने आलेल्या 20 रुग्णाचा स्वॅब असे एकूण 26 स्वॅब पॉझिटिव्ह आहेत. यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
'आम्हाला गावाला जाऊ द्या' म्हणत चंद्रपुरात 1500 परप्रांतिय मजूर रस्त्यावर
847 उत्तर भारतीयांना घेऊन नाशिकहून लखनौसाठी विशेष ट्रेन रवाना
मुंबईच्या पाहुण्यामुळे सांगलीची चिंता पुन्हा वाढली, महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव