एक्स्प्लोर
Advertisement
लॉकडाऊनमधलं आगळं वेगळं लग्न, पुणे पोलिसांनी केलं कन्यादान
दोन्ही बाजूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली.
पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या दरम्यान आयटी इंजिनिअर असलेल्या आदित्य बिश्त आणि डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाह यांचा विवाह पुण्यातील अॅमोनोरा क्लबमध्ये पार पडला. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे पुणे पोलिसांनी या मुलीचं कन्यादान केलं. मुलाचे वडील सैन्यात कर्नल असून त्यांच पोस्टिंग डेहराडूनला आहे तर मुलीचे वडील देखील सैन्यात डॉक्टर असून नागपूरमध्ये कार्यरत आहेत.
दोन्ही बाजूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी देखील लॉकडाऊनमधलं हे आगळं वेगळं लग्न पार पाडलं. हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे , पोलिस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी या लग्नाला हजर होते. पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केलं.
दरम्यान पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात आज आणखी 13 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 828 वर पोहोचला आहे. पुणे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 13 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1815 वरुन 1828 वर पोहोचला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement