(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramdas Athawale : '....तर प्रकाश आंबेडकरांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल', केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा थेट ऑफर
Ramdas Athawale : प्रकाश आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. ते एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही. त्यांनी आघाडी करणे आवश्यक आहे. असा सल्ला रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलं आहे.
Ramdas Athawale नागपूर : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अनेक निवडणूका लढूनही त्यांच्या जागा निवडून येत नाही. त्यामुळे मी एकदा म्हणालो होतो, की त्यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्या जागा ही निवडून येतील. त्यांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल. 1990 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते, तर आमच्या किमान दहा-बारा जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्री पद आम्हाला मिळालं असतं. मात्र तेव्हा ते आमच्या सोबत आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समजून घेतले पाहिजे, ते एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही. त्यांनी आघाडी करणे आवश्यक आहे. असा सल्ला देत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित नेते प्रकाश आंबेडकरांना एकप्रकारे थेट ऑफर दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
....तर आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच काही घडवू शकतो- रामदास आठवले
मी आणि प्रकाश आंबेडकर सोबत आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच काही घडवू शकतो. मी एकटा असल्याने दलितांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळत नाही. आम्ही दोघे एकत्रित आलो, तर ते होऊ शकेल. मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब यांच्या पक्षामध्ये आले पाहिजे. मी काही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षात आलं पाहिजे. असे आवाहनही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रकाश आंबेडकरांना केले आहे.
मला कुठलंही पद नको प्रकाश आंबेडकर यांना अध्यक्ष केलं तरी चालेल
प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलायला नको होतं. त्यांनी रिपब्लिकन पक्ष चालवायला हवा होता. बहुजनांना एकत्रित करण्याच्या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. रिपब्लिकन पक्षाचा एकत्रीकरण एखाद्या गटाने (खोब्रागडे गटाने) करून होणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना सोबत आणणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय झालेला एकत्रीकरण समाजाला मान्य झालं नाही. प्रकाश आंबेडकर सोबत आले, तर त्या एकत्रीकरणासाठी मी तयार आहे. मला कुठलंही पद नको प्रकाश आंबेडकर यांना अध्यक्ष केलं तरी चालेल. असे मोठे विधानही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी केलं आहे. आता त्यांच्या या आवाहनाला प्रकाश आंबेडकर कितपत दाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा