RBI on Bombay HC: नव्या चनली नोटा नेत्रहीनांचं हित नजरेसमोर ठेवत बनवलेल्या, नॅबच्या याचिकेवर उत्तर देताना आरबीआयची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
दिव्यांग व्यक्तींना चलनातील नव्या नोटा तसेच नाणी ओळखणे कठीण जात असल्याची तक्रार करत नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड (नॅब) या संस्थेच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : दृष्टीहीन तसेच अंध व्यक्तींना (Blind) सध्याच्या चलनातील नोटा आणि नाणी ओळखणं सोईस्कर व्हावं यासाठी या नोटांमध्ये स्पर्शज्ञान देणारी अनेक वैशिष्ट्य समाविष्ट केलेली आहेत, अशी माहिती सोमवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे (Reserve Bank Of India) मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. मात्र त्याची दखल घेत याचिकेत उपस्थित केलेल्या अन्य समस्या गंभीर आहेत त्याबाबत याचिकाकर्त्यांना उपाययोजना आणि शिफारसी प्रतिज्ञापत्रावर सुचविण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.
दिव्यांग व्यक्तींना चलनातील नव्या नोटा तसेच नाणी ओळखणे कठीण जात असल्याची तक्रार करत नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड (नॅब) या संस्थेच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन नोटा व नाणं कोणतं आहे?, हे ओळखता यावं यासाठी नोटांवर संकेतिक चिन्ह वापरण्याचे आदेश हायकोर्टानं आरबीआयला आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. ही याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आयबीआयकडून अॅप्लिकेशन विकसित केलेलं आहे जे दृष्टिहीन लोकही वापरू शकतात. तसेच या अॅपसह आरबीआयने दृष्टिहीन लोकांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांशीही सल्लामसलत केली असल्याची माहिती आरबीआयच्यावतीनं हायकोर्टाला देण्यात आली.
आरबीआयनं दृष्टीहीन व्यक्तींना नव्या नोटा ओळखता याव्यात यासाठी चिन्हे आणि रेषांसह अनेक स्पर्शज्ञान वैशिष्ट्ये विकसित केली आहेत. ज्यात 100 रुपयांच्या नोटेमध्ये त्रिकोण आणि चार रेषा आहेत, 500 रुपयांच्या नोटांमध्ये वर्तुळ आणि पाच रेषा आहेत आणि 2000 रुपयांच्या नोटेवर आयत आणि सात ओळींचा समावेश असल्याची माहितीही आरबीआयच्यावतीनं हायकोर्टाला दिली गेली.
संबंधित बातम्या :
भारतीय रिझर्व्ह बँक सतत चलनी नोटांचा आकार का बदलते?, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
RBI Board : RBI बोर्डात आनंद महिंद्रा, पंकज पटेल आणि आणखी दोन उद्योगपतींचा समावेश; जाणून घ्या
RBI On Currency Notes: नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार का? RBI ने दिली ही महत्वाची माहिती