RBI On Currency Notes: नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार का? RBI ने दिली ही महत्वाची माहिती
RBI On Mahatma Gandhi: भारतीय चलनी नोटांवर आता रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचेही फोटो दिसतील, अशा बातम्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे.
RBI On Mahatma Gandhi: भारतीय चलनी नोटांवर आता रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचेही फोटो दिसतील, अशा बातम्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. अशातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो नोटांवरून हटवण्यात येणार का? असा प्रश्न आता सोशल मीडिया आणि सामान्य नागरिक विचारू लागेल आहेत. याचेच उत्तर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलं आहे. याबाबत माहिती देताना आरबीआयने या बातम्यांचं खंडन केलं आहे. आरबीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी असं वृत्त दिले जात आहे की, आरबीआय सध्याच्या चलनातील नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून इतर काही लोकांच्या चित्रासह नोटा छापण्याची तयारी करत आहे. आरबीआयने या बातम्या नाकारल्या असून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय बँकेने सांगितलं आहे.
आरबीआयने केलं खंडन
अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक नवीन मालिकेच्या नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह नोटा छापण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रसिद्ध करण्यात आल्या. यावरूनच आरबीआयने ट्वीट करून एक प्रेस रिलीझ जारी केली असून त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही.
माध्यमांमधील एका गटाने असं वृत्त दिलं होत की, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या आरबीआय, सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीआयएल) यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे दोन वेगवेगळे वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीला पाठवले आहेत. प्रोफेसर दिलीप टी साहनी यांना त्यापैकी एकाची निवड करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारसमोर ठेवता जाईल. त्यावर सरकार अंतिम निर्णय घेईल. एका रिपोर्टनुसार, 2020 मध्ये आरबीआयच्या अंतर्गत समितीने महात्मा गांधींव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांच्या चेहऱ्यासह नोट छापण्याची शिफारस केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
Varanasi serial blasts: वाराणसीमधील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा, गाझियाबाद न्यायालयाचा निर्णय
काश्मिरी पंडितांच्या हल्ल्याविरोधात शिवसेना रस्त्यावर, नाशिकमध्ये तीव्र आंदोलन