एक्स्प्लोर
एसटीतील मोफत वायफाय सेवेतून वर्षाला एक कोटींचा महसूल : रावते
विधानसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात रावतेंनी ही माहिती दिली.
नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्यात आली आहे. यासाठी महामंडळाने एकही रुपया खर्च केला नाही, उलट यातून दरवर्षी एक कोटींचा महसूल मिळतो, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
विधानसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात रावतेंनी ही माहिती दिली. आमदार प्रकाश आबिटकर, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे यांनी एसटीमधील मोफत वायफाय सेवेमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
एसटी बससमध्ये वायफाय प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.
महामंडळाला या प्रकल्पाद्वारे वार्षिक परवाना शुल्क म्हणून प्रतीवर्षी एक कोटी पाच लाख इतका अतिरिक्त महसूल पुढील पाच वर्षांसाठी मिळणार आहे. तांत्रिक कारणास्तव वायफाय उपकरण बंद पडल्यास सदर कंपनीकडून त्याची मोफत दुरुस्ती करुन देण्यात येते, असंही रावतेंनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement