एक्स्प्लोर
सोलापुरात काँग्रेसला भगदाड, 7 नगरसेवक शिवसेनेत जाणार
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्तांकडे दिले असून सातही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पक्षांतर बंदी कायद्यान्वये संभाव्य निवडणूक बंदीच्या भीतीने नगरसेवकांनी अगोदरच आयुक्तांकडे राजीनामे दिले आहेत. सर्व नगरसेवक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील.
महेश कोठे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय होते. पण त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळीच काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेच्या तिकिटावर प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्याच वेळी कोठे यांचे समर्थक नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करतील, असं निश्चित मानलं जात होतं. अखेर या सात नगरसेवकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील या आऊटगोईंगचा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 44 नगरसेवकांसह काँग्रेस सध्या सोलापुरात सत्तेमध्ये आहे. त्यापैकी 7 नगरसेवकांनी राजीनामा देऊन पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement