Sanjay Raut : ... तर महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut : सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
Sanjay Raut : वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
नवा इतिहास निर्माण करावा
इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव असं राऊत यावेळी म्हणाले. वीर सावरकारांना भाररत्न द्यावा अशी आमची मागणी आहे. सातत्यानं आम्ही ही मागणी करत आहोत. मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून का धरत नाहीत? असा सवाल राऊतांनी यावेळी केला.
राजकारणासाठी भाजपनं सावरकरांचा विषय घेतला
सावरकर हे आणि भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असं इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी सावरकरांचा त्यांनी विषय घेतला असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांचा कायमच पुरस्कार केला आहे. तो आम्ही कायम करत राहू असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे ना महाराष्ट्राला मंजूर आहे ना शिवसनेला मंजूर आहे असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाहीत असे राऊत यावेळी म्हणाले.
सावरकरांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती
देशातील वातावरण हुकूमशाहीकडं जाणारं, गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं आहे. महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार वाढत आहेत. या मुद्यावर भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्याला चांगल समर्थन मिळत आहे. अशात सावरकरांचा विषय काढण्याची काही करज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. यावरुन महाविकास आघाडीतसुद्धा फूट पडू शकते असं मोठं विधान संजय राऊतांनी यावेळी केलं. कारण सावरकरांना आम्ही आमचं श्रद्धास्थान मानत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत आहोत. केंद्रात भाजपचे सरकार आहे. पण हे लोक सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत? अससवाल राऊतांनी केला. त्यांचे प्रेण नकली आहे का? हे पाहावं लागेल असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: