एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपच्या प्रस्तावावर शिवसेनेकडून प्रतिसाद नाही, भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
भाजपने शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा प्रस्ताव मांडला. यानुसार, मुख्यमंत्रीपदासह 26 मंत्रिपदं स्वत:साठी ठेवत, शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रीपद आणि 13 अन्य मंत्रिपदं देण्याची तयारी भाजपने दर्शवली होती.
मुंबई : एकीकडे मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समसमान वाटपावरून शिवसेना अडून बसली असताना, भाजपने शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा प्रस्ताव मांडला. यानुसार, मुख्यमंत्रीपदासह 26 मंत्रिपदं स्वत:साठी ठेवत, शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रीपद आणि 13 अन्य मंत्रिपदं देण्याची तयारी भाजपने दर्शवली होती. भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.
कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रीपद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती देण्यात येणार नाहीत हे भाजपनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपने देवेंद्र फडणवीस यांची गटनेते म्हणून निवड केली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.
शिवसेनेने भाजपच्या प्रस्तावाला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. भाजप सध्या शिवसेनेकडून उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाल्यानंतरच दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. या चर्चेत मंत्रीपदांचं वाटप होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
व्हिडीओ पाहा
गेल्या 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप सर्वाधिक 105 (नंतर आलेल्या 10 आमदारांसह 115) आमदारांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र, सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या 144 आमदारांची संख्या स्वबळावर मिळवण्यात भाजपला यश आले नाही. दरम्यान, निवडून आलेल्या 56 आणि नंतर सोबत आलेले 7 आमदार अशा 63 आमदारांमुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत आपला आक्रमक बाणा दाखवून देत, "भाजपच्या अडचणी दरवेळी समजून घेता येणार नाहीत", असा इशारा दिला होता. सेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समसमान वाटपाची वेळोवेळी आठवण गेल्या काही दिवसांत भाजपला करून दिली आहे. मात्र, खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीच्या वाटपाचा कोणताही फॉर्म्यूला ठरला नसल्याचं सांगितल्यानं, शिवसेना चांगलीच संतापली आहे. यामुळेच, काल भाजप-सेनेदरम्यान होणारी संयुक्त बैठकही रद्द करावी लागली. त्यापार्श्वभूमीवर, भाजपनं आज शिवसेनेला हा प्रस्ताव दिला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता, खलबतं सुरु, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी घडामोडींना वेग - सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement