Shivsena : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी, सुनावणीनंतर राहुल नार्वेकर दिल्लीवारी करणार
MLA Disqualification Case: आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) दिल्लीला जाणार असून ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे. जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. पण याच प्रकरणी 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने बदललेल्या वेळापत्रकावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.
शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी दिवसेंदिवस लांबत चालली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलं सुनावल देखील होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे. 13 ऑक्टोबर रोजी शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आज होणार आहे. शिवसेना अपात्रतेसंबंधी एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नबाम रेबिया केस (Nabam Rebia Case) लँडमार्क जजमेंट असून माझा निर्णय महाराष्ट्राला न्याय देणारा असेल अशी प्रतिक्रिया विधाससभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष सुनावणीनंतर दिल्ली दौऱ्यावर
आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. जी-20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीसाठी ते दिल्लीला जाणार असले तरी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी आधी या प्रकरणावर दिल्लीत कायदेशीर खलबतं होणार असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक कसं आहे?
- आमदार अपात्रतेच्या संदर्भात 12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे.
- 23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे.
- सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या या ठाकरे गटाच्या मागणीवर उद्या सुनावणी होणार
ही बातमी वाचा :