एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
Shivrajyabhishek | रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात, सोहळा लाईव्ह पाहता येणार
अखिल भारतीय राज्याभिषेक (Shivrajyabhishek) समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो.यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते.
रायगड : एकचं धून सहा जून असं म्हणत दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यंदा कोरोनाच्या सावटामुळं शिवप्रेमी रायगडावर पोहोचू शकले नसले तरी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. 6 जून 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून सोहळा साजरा करा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, तोच जोश, तोच उत्साह, तोच क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून. शिवराज्याभिषेक सोहळ्याची दरवर्षीची रायगडावरील लगबग तुम्ही सर्वजण सकाळी पाहण्यासाठी आतुर असाल म्हणूनच सकाळी 9 वाजता गतवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे. मी समजू शकतो मी केलेल्या आवाहनाला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या दोन दिवस कोकणात चक्री वादळाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मोबाईल टॉवर सुद्धा पडले आहेत. परिसरात रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. पण माझा शब्द आहे 6 जून 2020 शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही घरातून नक्की पहाल, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप शिवभक्तांच्या सहकार्याने 2008 ला मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शिवभक्त रायगडावरील हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी आतुर झालेले असतात. यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करून जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. घरीच राहुन शिवराज्याभिषेक साजरा करा यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक लाईव्ह पाहता येणार छत्रपती संभाजीराजे यांनी 10 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आज लिहिलेल्या पोस्टमध्ये देखील त्यांनी म्हटलं आहे की, सध्या दोन दिवस कोकणात चक्री वादळाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मोबाईल टॉवर सुद्धा पडले आहेत. परिसरात रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. पण माझा शब्द आहे 6 जून 2020 शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही घरातून नक्की पहाल, असंही त्यांनी म्हटलं आहे.३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना खुप खुप शुभेच्छा.. दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे.६ जून २०२० छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात! pic.twitter.com/JtdBkQFsG7
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 6, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
रत्नागिरी
Advertisement