एक्स्प्लोर
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला 32 कोटींच्या दोन इमारती अर्पण
शिर्डी : विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानाला देणगी स्वरुपात दिल्या आहेत. सरकारी दरानुसार या इमारतींची किंमत 32 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. संस्थानाच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देणगी ठरणार आहे़
डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानाचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरु करणार आहे.
पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण 9782.44 चौरस मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरुवारी साईचरणी अर्पण केल्या. या इमारतींची सरकारी दराप्रमाणे किंमत 32 कोटी 27 लाख 13 हजार रुपये आहे. या दानपत्रासाठीचे 1 कोटी 63 लाख रुपये इतकं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संस्थानने भरलं.
विरारच्या ओम साईधाम मंदिर ट्रस्टने शिर्डीला येणाऱ्या पदयात्रींसाठी शिर्डीजवळ 2008 मध्ये साईपालखी निवारा उभारला आहे. याठिकाणी पदयात्रींना निवास आणि भोजनाची मोफत सेवा पुरवण्यात येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement