एक्स्प्लोर
Advertisement
साताऱ्याच्या विकासात राजकारण करणाऱ्याला सोडणार नाही, उदयनराजेंची दमबाजी
माझं तिकीट मी आधीच काढलंय. एकच तिकीट असतं, जो जन्माला आला, त्याचं. माझं तिकीट आत्ताच काढू नका, सेवा करण्याची संधी द्या, असंही उदयनराजे मिष्किलपणे म्हणाले.
सातारा : सातारा शहराच्या विकासामध्ये राजकारण आणून कोणी ठेकेदारांना दमबाजी करत असेल, तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी दम भरला आहे.
साताऱ्यातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ काल उदयनराजेंच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमातच राजेंना राष्ट्रवादीच्या तिकीटाबाबत विचारलं असता, माझं तिकीट मी आधीच काढलंय. एकच तिकीट असतं, जो जन्माला आला, त्याचं. माझं तिकीट आत्ताच काढू नका, सेवा करण्याची संधी द्या, असंही ते मिष्किलपणे म्हणाले.
आपण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असल्याचं उदयनराजेंना विचारलं असता, त्यांनी या प्रश्नाला उत्तर न देताच सातारकरांना प्रश्नांकित ठेवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
राजकारण
Advertisement