एक्स्प्लोर
'सामना'वर बंदी घालू देणार नाही : व्यंकय्या नायडू

पुणे: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दै. 'सामना'वर बंदी घालण्याच्या मागणीला, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोध केला आहे. "सामना'वर निर्बंध घालू नयेत. मी तसं होऊ देणार नाही. त्यांना जे लिहायचं आहे, ते लिहू दे. पंतप्रधानांविरोधात लिहिणार असतील, तर 'सामना' स्वत:च आपली पातळी आणखी घसरवेल", असं व्यंकय्या नायडू म्हणाले.
कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?
याशिवाय सरकारमध्ये राहून एकमेकांवर आरोप करणं चुकीचं आहे. शब्द जपून वापरायला हवेत. भाजपची वाढती ताकद बघून, शिवसेनेला हातची सत्ता निसटत असल्याचं दिसतंय. त्यामुळेच शिवसेना नाराज आहे. भाजप आता मोठा भाऊ आहे, त्यामुळे निश्चितच भाजपला बहुमत मिळेल, असा दावा व्यंकय्या नायडूंनी केला.
सामनाविरोधात भाजपची तक्रार 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना पेपर छापला जाऊ नये, अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. 15 फेब्रुवारी म्हणजे बुधवारच्या अंकात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपनं निवडणूक आयोगाकडे तसं पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाचं 'सामना'ला पत्र 'तुमचा अभिप्राय काय आहे हे पुढील तीन दिवसात कळवावं’, अशा आशयाचं पत्र निवडणूक आयोगानं ‘सामना’ला पाठवलं आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीवर सामनाला आता हे पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिवसेना याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्याभाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचं ‘सामना’ला पत्र
'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक
आणखी वाचा























