एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला
पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं असून 10 दुकाने पाण्याखाली आले आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात सुरुवात केली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गडचिरोली : हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर जिल्ह्यात 48 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड तालुक्याला परत एकदा पुराचा फटका बसला असून पर्लकोटा नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
तर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात 61.7mm इतका पाऊस झाला असून भामरागड तालुक्यात सर्वाधिक 243.3mm इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे भामरागड मार्ग कालपासून बंद पडला आहे. जिल्ह्यात आणि छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं असून 10 दुकाने पाण्याखाली आले आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात सुरुवात केली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली शहरालाही पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे .
आयटीआय चौक, नगर परिषद, पेट्रोल पंप, कृषी महाविद्यालयात, कन्नमवार वार्ड, परिसर जलमय झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
येत्या 24 तासात ही नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज
नागपुरात पावसाने नियमित हजेरी लावायला सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यांनतर मंगळवारी दुपारी ही नागपुरात दमदार पाऊस झाला. तर आज दुपारपासूनही पावसाने शहरात सर्वत्र हजेरी लावली आहे. तसा पाऊस हळुवार पडत असला तरी अधून मधून पावसाची गती वाढत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या नागपूरकरांना हा पाऊस दिलासा देणारा ठरतोय. नागपूरला 80 टक्के पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाच्या पाणी साठ्यात तीव्रतेने वाढ होत आहे. आज सकाळी तोतलाडोह धरणात 43 टक्के उपयुक्त जलसाठा होता. तिकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह मध्य भारतात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने नागपूरसह विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 24 तासात ही नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement