एक्स्प्लोर
Advertisement
सरकारने भूमिका स्पष्ट करावी, बेमुदत बंदचा राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा
सरकारने पाथरीकडून जे दावे केले जात आहेत त्याला पाठबळ देऊ नये. मुख्यमंत्र्यांनी आपले विधान मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. कोट्यवधी भाविकांच्या भावनांचा आदर मुख्यमंत्र्यांनी करावा ही शासनाची भूमिका नाही.
शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन शिर्डीकर नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिर्डीच्या लोकांनी केलेल्या बंदला माझा पाठिंबा आहे. अत्यावश्यक सेवा, मंदिर यातून वगळण्यात आले आहे, भाविकांना त्रास होऊ देणार नाही. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर बेमुदत बंद करण्याची वेळ येईल, असा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन शिर्डीकर नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वादावरुन इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी बंदची हाक देण्यात आली. परिसरातील 25 गावं बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
Sai Baba | साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डी परिसरातील 25 गावांचा बंदला पाठिंबा | ABP Majha
पाटील म्हणाले, साई चरित्रामध्ये जन्मस्थान बाबत कुठेही उल्लेख नाही. 100 वर्षांत कोणाकडे काही पुरावा नव्हता. अचानक पाथरीकरांकडे कुठून पुरावा आला. पाथरीकरांनी वाद वाढवू नये. शिर्डीचे अर्थकारण याच्याशी जोडले आहे असे आरोप करू नये. संस्थानाने पुढाकार घ्यावा गैरसमज दूर करावा. सरकारने पुढाकार घेऊन वाद मिटविण्यात यावा. सरकारने पाथरीकडून जे दावे केले जात आहेत त्याला पाठबळ देऊ नये. मुख्यमंत्री यांनी आपले विधान मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. कोट्यवधी भाविकांच्या भावनांचा आदर मुख्यमंत्री यांनी करावा ही शासनाची भूमिका नाही.
साईबाबा मंदिरामुळे त्या भागाच्या विकासाचे मानबिंदू तयार झाले. देशभरात इतर साई मंदिर आहे. तसेच पाथरीचे मंदिर आहे. कुठल्या गावाला किती निधी द्यावा हा त्या सरकारचा मुद्दा आहे. पण जन्मस्थानचा मुद्दा उपस्थित करून निधी देणे यावर आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन विधान केले असते तर आज ही वेळ आली नसती. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली असेल पण त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. या आधी राष्ट्पती बोलले मात्र नंतर त्यांना खुलासा केल्यावर तो विषय संपला.
संबंधित बातम्या :
लोकसंख्या नियंत्रण संघाचा पुढचा अजेंडा, सरसंघचालक मोहन भागवतांकडून संकेत
PHOTO | ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement