एक्स्प्लोर

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आंदोलनाच्या पवित्र्यात; उजव्या विचारसरणीकडे झुकल्याने अनेकांचे धाबे दणाणणार

प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी आता वारकरी संप्रदायाच्या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांकडे आल्याने वंचित बहुजन आघाडी आता पुरोगामी विचाराकडून उजव्या विचाराकडे वळू लागल्याचा धसका अनेकांनी घ्यायला सुरुवात झाली आहे. देव आणि धर्म हे सनातनी मंडळींचे मुद्दे कधीही देव न मानणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी हाती घेतल्याने राज्यातील मंदिर उघडणे हा केवळ एक मुद्दा बनला असून खरे विचारमंथन डावे आणि उजव्या विचारसरणीचे अंतर कमी करण्यासाठी आंबेडकरांनी टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे काय याच विचाराने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. आंबेडकरांचे हे पाऊल अतिशय योग्य असल्याचा निर्वाळा वारकरी संप्रदायातून येत असून मंदिरे उघडल्यावर देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि याचा उपयोग कोरोनासाठी लढाण्याला होईल, असा विश्वास वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ नेते माधवमहाराज शिवनीकर यांना आहे. मंदिरे उघडणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

राज्यातील दारू दुकाने सुरु झाली, सर्व व्यवहार सुरु झाले, लग्न कार्ये होऊ लागली मग भजन कीर्तन करणे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करणे का सुरु होत नाही, असा सवाल विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे करतात. याचसाठी आम्ही हे आंदोलन सुरु केले असून जेव्हा सरकार आणि शास्त्रज्ञांना अजून लस शोधण्यात यश येत नाही तेव्हा किमान मंदिरामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जा तरी आम्हाला मिळवता यावी अशी भूमिका मांडतात. यासाठी वारंवार सरकारला मागणी करूनही सरकार विचार करत नसल्याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सुरु केल्याचे सांगतात. सरकारने निर्णय न घेतल्यास 31 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार असल्याचे अरुण महाराज सांगतात.

राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला जोर, शिर्डीकरांचा न्यायालयीन लढाईसोबत उपोषणाचा इशारा

प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी केला आहे. विश्व वारकरी सेनेला कोणताही जनाधार नसल्याने 100-200 लोके कशीतरी जमा होतील मात्र यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचा आरोप सर्वगोड यांनी केला आहे.

मंदिर उघडणेबाबत आंबेडकरांचे आंदोलन हे केवळ राजकीय असल्याचा आरोप भगताचार्य बाळासाहेब बडवे यांनी केला आहे. एका बाजूला मंदिर खुले करण्याबाबत वारकरी संप्रदायातून मिळणार वाढत पाठिंबा हे आंबेडकरांच्या विचारांचा विजय असल्याचे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक वामनराव धांडोरे याना वाटतोय. आंबेडकर हे नेहमीच बहुजनातील वंचितांच्या बाजूने उभे राहत आले आहेत. मंदिरे बंद झाल्याने हजारो बहुजन कुटुंबासोबत काही ब्राम्हण कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी मंदिरे उघडल्यास हजारो गोरगरीब कुटुंबाला जगात येणार असल्यानेच आंबेडकरांनी हा मुद्दा हातात घेतल्याचे धांडोरे याना वाटते. यामुळे आंबेडकरांना राजकीय फायदा होईल मात्र ज्यांनी हिंदू धर्म पेटंट म्हणून आजवर वापरला त्यांना आंबेडकरांची भूमिका नक्कीच अडचणीची असल्याचे धांडोरे सांगतात. वास्तविक या भूमिकेमुळे डावे व उजवे विचारसरणीतील अंतर कमी होऊन सामाजिक विषमता कमी होईल असा विश्वास धांडोरे याना वाटतो. आज हे नुसते मंदिर उघडण्याचे आंदोलन वाटत असले तरी भविष्यात यामुळे मोठी सामाजिक समता येईल असा विश्वास धांडोरे व्यक्त करतात.

राज्यातील मंदिरं तातडीनं सुरू करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

वास्तविक मंदिराच्या प्रश्नावर मताची बेगमी करणारे भाजप-शिवसेना यांनी वारकरी संप्रदायाला या प्रश्नावर वाऱ्यावर सोडून दिल्यावर डाव्या विचाराचे म्हणून ओळखले जाणारे प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न हाती घेतल्यावर आता आंबेडकर मायावतींचे मार्गावर निघाले अशी हाकारी काही मंडळी देऊ लागली असली तरी कोरोनाच्या अडचणीच्याकाळात वारकरी संप्रदायाच्या मदतीला आंबेडकर धावून आल्याने आज वारकरी संप्रदायाला वंचित आपलेसे वाटू लागले आहे. जरी आंबेडकरांनी राजकारणासाठी सॉफ्ट हिंदुत्व जवळ करण्यास सुरुवात केली असली तरी यामुळे समाजातील विषमता कमी होईल असा विश्वास डाव्या चळवळीतील अभ्यासकांना वाटत आहे.

महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget