एक्स्प्लोर
मुंबई-पुण्यात चोऱ्या करण्यासाठी 'तो' यूपीवरुन विमानाने यायचा, हायफाय चोर गजाआड
विमानाने मुंबई, पुण्यात येऊन चोऱ्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका चोराच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे : विमानाने मुंबई, पुण्यात येऊन चोऱ्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका चोराच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अनिल राजभर असे या हायफाय चोराचे नाव असून त्याच्या चोऱ्या सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. विशेष म्हणजे हा चोर दिवसाढवळ्या घरफोड्या करायचा. त्याच्याकडून 25 तोळे सोने आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. राजभर उत्तर प्रदेशमधून विमानाने मुंबई किंवा पुण्यात यायचा, आलिशान हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस रहायचा. मग रेकी करून तो बंद घरांवर डल्ला मारायचा, दागिन्यांची तिथेच विल्हेवाट लावून (विकून)तो विमानानेच घरी परतायचा. मुंबई आणि पुण्यात यापूर्वी असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील एका घरफोडीवेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला, अन् त्याचं बिंग फुटलं. वाकड पोलिसांनी तीन पथकं तैनात करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























