एक्स्प्लोर
फटाक्यामुळे उस्मानाबादच्या उमरग्यात दहा दुकानांना आग
उस्मानाबाद : सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील उमरगा येथे फटाक्यांमुळे पाच दुकानांना आग लागल्याची माहिती आहे. उमरग्यामधील बस स्थानकामागच्या इंदिरा नगरात लक्ष्मीपूजनानंतरच्या फटाक्यांच्या आतिषबाजीच्या वेळी ही घटना घडली.
बिरुदेव एंटरप्राइझेस या फर्निचरच्या दुकानाने सर्वात आधी पेट घेतला. गादी बनवण्याच्या दुकानात फटाका घुसल्याने कापसाला आग लागली. त्यानंतर आग वेगाने पसरुन शेजारच्याच प्लास्टिकच्या पाईपच्या दुकानाला आग लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिसरे बांगड्याचे दुकानातील काही साहित्य हलवलं, पण तेही आगीत सापडलं.
या घटनेनंतर उमरगा शहरात धुराचे लोट पसरले आहेत. नगर परिषदच्या दोन अग्निशमन गाड्या असून एकातच पाणी होतं, गाड्यांमध्ये पाणी भरण्यास वेळ लागत असल्यामुळे जवळच्या मुरुम व नळदुर्ग शहरातील अग्निशमन गाड्या तातडीने मागवल्या. घटनास्थळी नागरिकांनी मोठी मदत केली असून स्वतःच्या घरातून पाणी टाकून आग विझवण्यासाठी मोठं सहकार्य केलं.
यात नगरसेवक बालाजी सुरवसे डोक्याला मार लागून जखमी झाल्याची माहिती आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीपूजनाच्या वेळी घटना घडल्याची माहिती आहे.
औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली
औरंगाबादमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग लागून अग्नितांडव झाल्याची घटना ताजी आहे. औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली, तर 112 वाहनं जळून खाक झाली. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडे अकराच्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं आगीची भीषणता काही क्षणातच जाणवून दिली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement