एक्स्प्लोर
जायकवाडीत केवळ 3.9 टीएमसी पाणी पोहोचलं, धरणांतून पाण्याचा विसर्ग बंद
जायकवाडीत केवळ 3.9 टीएमसी इतकं पाणी पोहचल्याचं समोर आलं आहे.
औरंगाबाद : जायकवाडीत केवळ 3.9 टीएमसी इतकं पाणी पोहचल्याचं समोर आलं आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी मुळा, दारणा, पालखेड आणि निळवंडेतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं होतं. पण त्यापैकी फक्त 3.9 टीएमसीच पाणी जायकवाडीत पोहोचल्यामुळे मुळा, दारणा, पालखेड धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे.
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी सध्या केवळ निळवंडेतून जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तोही उद्या बंद करण्यात येणार आहे.
गंगापूर धरणातून दिवसभर पाण्याच्या विसर्गानंतर 1 नोव्हेंबरला अचानक पाणी थांबवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले होते. जलसंपदा विभागाच्या या नियोजनशून्यतेमुळे 1 लाख 70 हजार टँकर पाणी वाया गेलं होतं. म्हणजेच कोट्यवधी लीटर पाण्याची नासाडी झाली.
84 लाख 95 हजार कुटुंबांना हे पाणी वापरता येऊ शकलं असतं. हे पाणी आता ना धड नाशिककरांना मिळालं, ना मराठवाड्याला. नाशिकची भविष्यातील जलसिंचनाची तूट लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा विभागानं म्हटलं होतं. लाभक्षेत्र विकास महामंडळाला लिहिलेल्या पत्रात पाणी थांबवण्याच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाने 1 तारखेला संध्याकाळी साडे सहा वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement