एक्स्प्लोर
महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही : डॉ. नीलम गोऱ्हे
सोशल माध्यमांवरून एखाद्या महिलेला, मुलीला धमकी येत असेल तर पोलिसांनी तिच्या तक्रारीची प्रतीक्षा करू नये. स्वत:हून कारवाई करावी. वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या ट्विटर आणि फेसबुक हॅण्डलला टॅग करण्याऐवजी पीडित महिलांना थेट महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डला टॅग करून तक्रारी कराव्या.
नागपूर : महिला सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांना बलात्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यांना सोशल माध्यमांवरून ट्रोलिंग करण्यात येत आहे. अशा गुन्ह्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात सायबर गुन्हे विषयक आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.
गोऱ्हे म्हणाल्या, ट्रोलिंग करणाऱ्याचे खाते खरे असो की बनावट, अशा ट्रोलींग करणाऱ्यांना शोधून काढा आणि त्यांना तुरुंगात टाका. महिला सुरक्षेविषयी कोणतीही हयगय केली जाणार नाही. सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे. त्याचा परिपूर्ण वापर करावा. सध्या राज्यात 47 सायबर पोलिस स्थानके आहेत. त्याची संख्या कशी वाढविता येईल, यावरही आगामी काळात भर देण्यात येणार आहे.
बै, सोशल माध्यमांवरून एखाद्या महिलेला, मुलीला धमकी येत असेल तर पोलिसांनी तिच्या तक्रारीची प्रतीक्षा करू नये. स्वत:हून कारवाई करावी. वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या ट्विटर आणि फेसबुक हॅण्डलला टॅग करण्याऐवजी पीडित महिलांना थेट महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डला टॅग करून तक्रारी करण्याचे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी या वेळी केले. सर्व पोलिस दलाने महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डलवर लक्ष ठेवावे व त्यानुसार पुढील कारवाई करावी. धमकी देणाऱ्याचे सोशल खाते खरे असो किंवा बनावट त्याला हुडकून काढाच, असे निर्देश त्यांनी दिलेत. टिकटॉक आणि इतर सोशल साइट्सनी आपापल्यास्तरावर संवेदनशील संदेश, व्हिडीओ याबद्दल दक्षता बाळगावी व पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या.
पीडित महिलेपर्यंत जाताना पोलिसांनी साध्या वेशात जाण्याच प्रयत्न करावा. त्यामुळे तक्रारकर्त्या महिलेची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस दलासह सायबर विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
सायबर सेलचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या सध्याच्या स्थितीची माहिती उपस्थितांना दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईंची संख्या देखील त्यांनी नमूद केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement