एक्स्प्लोर
Advertisement
उदयनराजेंबद्दलचा प्रश्न, अजित पवारांची बगल, तटकरेंचा हस्तक्षेप
सातारा: खंडणी आणि मारहाण प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले जर दोषी असतील, तर त्यांचा पाठिशी पक्ष राहाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. ते साताऱ्यात बोलत होते.
खंडणी आणि जिवे मारण्याच्या आरोपाखाली उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.
याबाबत विचारलं असता तटकरे म्हणाले, "उदयनराजेंच्या चुकीला राष्ट्रवादी पक्ष पाठिंबा देणार नाहीत. त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय हे आम्हाला माहित नाही. जर उदयनराजे दोषी असतील तर पक्ष म्हणून आम्ही पाठिशी राहणार नाही"
...तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालच्या साताऱ्यातील मेळाव्याला खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहिले. पक्षमेळाव्याच्या पोस्टरवरही त्यांचा फोटो नव्हता.
याबाबतीतही तटकरेंनी माहिती दिली. तटकरे म्हणाले, "उदयनराजे हे राष्ट्रवादीत आहेत की नाही हे त्यांनाच विचारा. ते बॅनरवर का नाहीत हे जिल्ह्यातील अन्य नेते सांगतील.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेतील बहुतेक प्रश्नांची उत्तरं अजित पवारांनी दिली. मात्र उदयनराजेंबाबतचा प्रश्न येताच, सुनील तटकरेंनी तातडीने हस्तक्षेप करत पक्षाची भूमिका मांडली.
संबंधित बातम्या
साताऱ्यात उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल
उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता
...तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement