एक्स्प्लोर
शेळी, ससा नव्हे, तर शिवसेनेचा वाघ आता कासव झालाय : अजित पवार
स्वबळावर निवडणुका लढवायला चाललेल्या शिवसेनेने तीन वर्षात 100 वेळा सरकारमधून बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या, असेही अजित पवार म्हणाले.
जालना : बाळासाहेब ठाकरेंच्या काळात असलेला शिवसेनेचा वाघ आता शेळी, ससा नव्हे, तर कासव झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना आता कासवासारखी मान आत घालून बसते. काहीच करत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली वाघाची शिवसेना आता शिवसेना राहिलेली नाही, तर त्या वाघाची शेळी, ससा नव्हे, तर कासव झालं आहे.”, असे अजित पवार म्हणाले.
त्याचसोबत, “स्वबळावर निवडणुका लढवायला चाललेल्या शिवसेनेने तीन वर्षात 100 वेळा सरकारमधून बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या. मात्र 15 वर्षात पहिल्यांदाच सत्ता मिळाली, त्यामुळे ते कशाला सत्ता सोडतील?” असा सवाल करत अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement