एक्स्प्लोर

नारायण राणेंना पक्षात ठेवल्यास रश्मीसह घर सोडेन, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना धमकी दिली होती, राणेंचा आत्मचरित्रात दावा

नारायण राणेंना पक्षात ठेवलंत, तर मी घर सोडेन, असं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितल्याचा दावा राणेंनी आत्मचरित्रातून केला आहे

मुंबई : नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर घर सोडून जाईन, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचा खळबळजनक दावा खासदार नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे. राणेंचं आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 'राणेंना पक्षात ठेवलंत, तर मी घर सोडेन, असं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितलं होतं. शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी आपल्याला बोलावलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितलं होतं, की राणेंना पक्षात ठेवलं तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ', असा दावा राणेंनी केला आहे. VIDEO | नारायण राणेंच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेसंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट | एबीपी माझा 'माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यामुळे मनोहर जोशींचा राग होता. जोशी उद्धव ठाकरेंच्या जवळचे झाले. वरकरणी जरी मनोहर जोशी पक्षाचे चिंतक आहेत, असं वाटत असलं, तरी त्यांच्यामुळे आजची स्थिती आहे.' असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा'च्या हाती नारायण राणेंचं आत्मचरित्र 'नो होल्ड बार्ड'ची काही पानं लागली आहेत. मनोहर जोशींनी कान भरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राणेंना डावलून सुभाष देसाईंना विरोधी पक्ष नेते पद दिल्याचा खळबळजनक दावा देखील राणेंनी पुस्तकात केला आहे. Narayan Rane | काय सांगतात नारायण राणेंचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP Majha शिवसेना का सोडली यामागचं खरं कारण आत्मचरित्रात आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते या चरित्रात लिहिलं आहे, असंही नारायण राणेंनी सांगितलं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्व पक्षांमधील प्रवास लिहिल्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं होतं. VIDEO | अब आएगा मजा, सबका हिसाब होगा, नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत आधीच राणेंनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिले होते. नारायण राणेंनी 1972 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात नारायण राणेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. आघाडीची सत्ता असताना 2005 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget